16.3 C
New York
Wednesday, May 15, 2024

Buy now

शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख श्री अशोक गाडवे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश

 

बीड/ प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांची निवड झाल्यापासून केज. परळी. अंबाजोगाई शहरात व तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम जोरात चालू असून सर्व शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत याचाच एक भाग म्हणून आज शिंदे गटात प्रवेश केलेले व सध्या चालू पदावर रुजू असलेले उपजिल्हाप्रमुख श्री अशोक गाढवे यांनी पक्षावर व जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून परत घर वापसी केली आहे. काल दिनांक22/04/2024 रोजी हॉटेल अन्विता बीड येथे किशोरजी पोतदार साहेब. बीड लोकसभा प्रमुख माजी आमदार सुनील धांडे सर बीड जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे . बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या हस्ते व तालुका प्रमुख बाळासाहेब शेप प्रिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला. यावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे.जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते जिल्हाप्रमुख गणेश वरेकर. युवा सेना जिल्हाप्रमुख रविराज बडे. जिल्हा समन्वयक संजयजी महाद्वार. बीड शहर प्रमुख निजाम शेख. शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन कदम उपजिल्हाप्रमुख शिवाजी दादा कुलकर्णी. केस तालुका प्रमुख अशोक जाधव.शहर प्रमुख अशोक हेडे. शहर प्रमुख केज तात्या रोडे. उपतालुका प्रमुख बालाजी चाटे उप तालुका प्रमुख शिवनारायण गुजर.उपतालुका प्रमुख निखिल पाडुळे. युवा सेना श्रीकांत कदम. तालुका सचिव बाबा भिसे.शहर सचिव शंकर भिसे. विधानसभा नेते रमेश सुडे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या