16 C
New York
Wednesday, May 15, 2024

Buy now

जिल्ह्यातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे सर्व युवाशक्ती ही डॉ. अभय पाटील यांचा पाठीशी – युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष – निनाद मानकर 

काँग्रेस उमेदवार यांच्या प्रचारार्थ चलो घर घर अभियान

तालुका प्रतिनिधी – योगेश मेहरे /अकोट

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार्थ चलो घर घर अभियान राबविन्यात येत असून अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस अंतर्गत अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर या तीन विधानसभा क्षेत्रांत अकोला लोकसभा काँग्रेस पक्षाचे चे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ हे अभियानाला प्रारंभ झाला असून हे अभियान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष निनाद मानकर तसेच युवक कांग्रेस तालुकाध्यक्ष रोशन चिंचोलकार व विधानसभा अध्यक्ष निलेश आग्रे यांच्या नेतृत्वाखाली होत असून या अभियानात विधानसभा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आवेश खान, वशिम खान, जुबेर खान योगेश मेहरे, श्रीकांत कोकाटे, गोपाल धुळे, श्याम अंभोरे, पवन बोंद्रे, सुयोग जुनगरे हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक घरा घरात काँग्रेसचे यश आणि मोदींच्या अपयशाबद्दल माहिती देणाऱ्या माहिती पत्रकांचे वितरण आणि उमेदवारांचे प्रोफाईल असलेले पत्रके घरा घरात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य वाटप करणार आहे त्या मध्ये मोदी सरकारच्या अपयशाची 10 ठळक वैशिष्ट्य आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही निर्माण करण्यात काँग्रेस चे योगदान या विषयी माहिती त्या पत्रकांमध्ये असून उमेदवाराच्या प्रचार्थ घरा घरा पर्यंत हे पत्रक वाटप करण्याचे अभियानाला अकोला जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस च्या वतीने सुरवात झाली असून या अभियानाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. अशा प्रकारे जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.

कांग्रेस चे पाच विषयावर न्याय गॅरंटी असलेले पत्रक व ती कांग्रेस ची न्याय गॅरंटी मिळवण्यासाठी 9911041424 या नंबर वर मिस्कॉल सुद्धा मारण्यात येत आहे त्या न्याय गॅरंटी मध्ये युवा न्याय – पहिली नोकरी पक्की, पेपर फुटी पासून मुक्तता, परीक्षार्थींना वयामध्ये सूट फास्टट्रॅक कोर्ट आणि कठोर कायदा, युवा रोशनी,

जय जवान – अग्नि विहीर योजना रद्द होईल लष्करातील जुनी भरती प्रक्रिया पूर्वरत होईल

किसान न्याय – एम एस पी ची कायदेशीर आम्ही कर्जमाफी आयोगाची निर्मिती कृषी उपकरणे जीएसटी मुक्त असतील इत्यादी विषयांवर गॅरंटी कार्ड चे वाटप कऱण्यात आले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या