15.2 C
New York
Wednesday, May 15, 2024

Buy now

राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस पदी शामराव हुले यांची निवड

 

पाटोदा (गणेश शेवाळे) राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी शामराव हुले यांची निवड झाल्याने त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला अच्छे दिन येणार असुन शामराव हुले हे छत्रपती शिवाजी महाराज शाहु फुले आंबेडकर विचारधारेवर चालणारे खंबीर नेतृत्व असल्याने त्यांची पक्ष वाढीस मोठी मदत होणार आहे सर्व सामान्य नागरिक,शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी शामराव हुले यांनी आवाज उठवला असल्यामुळे जिल्हाभरात त्यांची चांगली ओळख असल्याने बीड राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला धाडसी व सर्व समाजात मिळुन मिसळून चालणारा चेहरा मिळाला असल्याने येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत यांचा मोठा फायदा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस पदी शामराव हुले यांनी पदाचा पदभार देण्यात आला यावेळी शामराव हुले बोलताना मनाले गोर गरीब जनतेची कामे पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावणार तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतही सर्वच जागेवर पक्षाचे उमेदवार निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस यांनी सांगितले बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शामराव हुले यांची निवड झाल्याने पाटोदा तालुक्यात जल्लोष होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या