15.4 C
New York
Thursday, May 16, 2024

Buy now

वन विभाग व विद्यूत वितरण कंपनी च्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी पोहचले पोलीस ठाण्यात

 

माहूर प्रतिनिधीजावेद शेख

वाई बाजार सह सारखणी विद्यूत वितरण कंपणी व वन विभागाच्या गलथान व हलगर्जी पणाच्या कारभारला कंटाळून परिसरातील शेकडो शेतकरी थेट पोलीस दरबारी धडक देत सतत वाढत चाललेल्या त्रासाला आळा घालण्यासाठी आवाज उठवीले . चालू हंगामात खरीप पिक पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्याला साथ न दिल्या मुळे शेतकरी पूर्णतः रब्बी पिकावर अवलंबून आहे . सदया रब्बी पिक बऱ्या पैकी आले असून सर्वत्र हिरवळ पहायला दिसत असले तरी यात मात्र आता विद्यूत वितरण कंपनी खोडा घालताना दिसत आहे . सकाळी सहाला विद्यूत पुरवठा खंडीत केला जातो तो रात्रीच्या आठ वाजे पर्यंत तो तसाच राहतो . रात्रीला पूरवठा केला जातो पण सदया परिसरात वन्य हिस्त्र प्राण्याचा हौदोस सुरू असून दररोज शेतकऱ्याच्या पाळीव प्राण्यांचा फडसा पाडला जातो आहे . शेती बरोबर पूरक व्यवसाय हा पशु पालनाचा असून त्या पासून तुटपूंजी का होईना ती आर्थिक मदत शेतकरी वर्गाला मिळते परंतू त्यावरही आज वन विभागाच्या उदाशीन धोरणा मुळे व चुकीच्या नियोजना मुळे वन्य हिस्त्र प्राणी माणवी वस्तीवर हल्ला चढवत पशुधन फस्त करत आहे . हे एक नव संकट शेतकरी वर्गावर येऊन ठेपला आहे. सद्याची परिस्थिती पाहता दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे . दिवसा लाईन राहत नाही रात्री पाणी देण्यासाठी जाव शेतावर जाव लागत गेलेतर प्राण्याची भिती न गेले तर पिक वाळुण जाण्याची भिते अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यानी कराव तरी काय हा प्रश्न आहे . दररोजच्या घडत असलेल्या घटनां पाहुण हतबल झालेला शेतकरी दाद मागण्यासाठी थेट पोलीस स्टेशन पोहचला असून या परिस्थित सुधारणा न झाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जाणार असल्याचे अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ . शंकर सिडाम , कॉ . प्रल्हाद चव्हाण, कॉ डॉ. बाबा डाखोरे, कॉ . राजकुमार पडलवार, कॉ . अमोल आडे, कॉ. गांगजी मेश्राम , कॉ . संजय मानकर यांनी सांगितले असून पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत राजू पाटील गांवडे, चंद्रभान निलेवाड, मारोती करपते, प्रविण पाटील डोके, विष्णु आडे गौतमराव भालेराव अविनाश राठोड रंजीत जाधव मोहण चव्हाण संतोष गोलमवार सह अनेकांच्या स्वाक्षरी आहे .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या