17.5 C
New York
Wednesday, May 15, 2024

Buy now

वीस वर्षांनंतर विकासभु आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्यामुळे पाटोदा तालुका होऊलागला पाणीदार – नगरसेवक बाबुराव जाधव

 

पाटोदा | प्रतिनिधी♦ पाटोदा तालुका हा नेहमी दुष्काळ भाग म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो मात्र शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे काका हे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार झाल्या पासून पाटोदा तालुक्याचे जनुकाय भाग्य बदलण्यास सुरुवात झाली आहे यांचे कारण म्हणजे पाटोदा तालुक्यात उगम असणार्‍या मांजरा नदीवर पारगाव,आनपटवाडी,नफरवाडी,

या तीन गावात कोल्हापुरी पद्धतीचे बांधारे मंजूर करून आनुन प्रत्यक्षात या कामालाही सुरुवात झाली आहे आमदार आजबे हेवढावरच न थांबता पाटोदा तालुका पाणीदार करण्यासाठी पाटोदा तालुक्यातील खडकवाडी, तगारा,बेनसुर,वैद्यकिन्ही,पांचग्री, डोमरी,डोगरकिन्ही,नायगाव, गारमाता,बेलवाडी यासह तालुक्यातील इतर गावात ही शेतकऱ्यांचा कायमचा पाणी प्रश्न मिठावावा म्हणून बंधारे कामासाठी भरभरून निधी आणल्यामुळे पाटोदा तालुक्यातील शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे,आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार आजबे काका झाल्या पासून शेतकर्‍यांच्या निगडीत पाणी आणि वीज व इतर प्रश्नला त्यांनी कायम प्राधान्य दिले असल्यानेच मतदार संघातील शेतकरीवर्ग सुखी समाधानी झाला आसुन वीस वर्षानंतर पाटोदा तालुका पाणीदार होईला लागल्यामुळे शेतकरी पुत्र आमदार बाळासाहेब आजबे काका यांचे पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक बाबुराव जाधव यांनी आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या