15.2 C
New York
Wednesday, May 15, 2024

Buy now

शेणखत वापरण्याकडे पुन्हा शेतकरी वर्गाचा कल वाढतोय

 

राधानगरी प्रतिनिधी | सुभाष चौगले  :-     पूर्वापास शेतकरी वर्ग शेतीमध्ये आपल्या जनावरांपासून मिळणाऱ्या मलमूत्राचा म्हणजे शेणखताचा वापर शेतीमध्ये जरूर करत असे. पण कालांतराने रासायनिक खते आली आणि शेतकरी वर्ग रासायनिक खताकडे वळला पण सेंद्रिय खताचे आता शेतकऱ्याला महत्त्व पटले असल्याने शेतकरी वर्ग आपले शेणखत विक्री न करता आपल्या शेतामध्ये त्याचा वापर करत असून हा वापर आता वाढत जाणार आहे. शेणखत शेतीसाठी अत्यंत फायदेशीर असून या खताचा वापर शेतजमिनीत झाल्यास शेतजमिनीचा पोत सुधारतो. दर्जेदार उत्पादनासाठी शेणखत फायदेशीरच आहे.

रासायनिक खतांचे वाढते दर व शेतीमध्ये ब-याच वर्षापासून रासायनिक खताच्या अतिवापरामुळे कांही जमिनीचा पोत घसरत चालला आहे. जमिनीचा पोत सुधारावा याकरिता शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे वळले आहेत.शेतकरी शेणखत वापरावर भर देत असल्याचे चित्र आता ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.

ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मानवी आरोग्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापराने मानवी आरोग्य धोक्‍यात आले आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतक-यांनी पुन्हा एकदा शेणखतालाच जास्त पसंती दिल्याने त्याची मागणी वाढली आहे. शेणखतामध्ये नत्र, स्फूरद, पालाश असते. सेंद्रिय खत हा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मातीतील उपयुक्त जैविक घटकांच्या वाढीसाठी चांगले कुजलेले शेणखत फायदेशीर ठरते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो व उत्पादनात वाढ होते. मिळालेले उत्पन्न जास्त दिवस टिकते आणि त्याचा दर्जा ही सुधारतो. विषेश म्हणजे ही खते चुकुन जादा पडल्यास जमिनिवर आथवा पिकांवर कोणताही वाईट परिणाम होत नाही उलट फायदाच होतो. शिवाय दुग्ध गोठा व्यवसाईक शेतक-यांना शेणखताला दरही चांगला मिळत आहे.

शेतकऱ्यांनी शेण खताची विक्री टाळावी.

  बरेच शेतकरी शेणखत विक्री करतात पण हेच खत स्वतःच्या शेतात वापरले तर शेतीचे उपन्न वाढून पीक उत्पादनात वाढ होईल. म्हणून शेण खताची विक्री टाळावी.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या