15.2 C
New York
Wednesday, May 15, 2024

Buy now

आष्टी येथे होणाऱ्या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : सरपंच माऊली वाघ

 

अहमदनगर | प्रतिनिधी :- मा. आ. भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून आष्टी तालुक्यात प्रथम 24 ते 27 डिसेंबर व 2023 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय समोर नगर बीड रोड या ठिकाणी प्रथमच कृषी प्रदर्शन होत आहे. आष्टी मध्ये कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून संशोधन संस्था नवीन उद्योजक , शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पन्नाने सादर करणार असून महाराष्ट्रातील शेतकरी भेट देतील. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे कृषी प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रामुख्याने बाजार भाव , जल व्यवस्थापन शेतमालाचे मूल्यवर्धन जैवतंत्र नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या कृषी प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेल्या नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती शेतकरी घेऊ शकतील. या कृषी प्रदर्शनाला अनेक दिग्गज मान्यवर – कृषी क्षेत्रातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी आष्टी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन चा लाभ घ्यावा.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या