22.4 C
New York
Saturday, June 1, 2024

Buy now

निमगांव वायाळ येथील रेती हर्राशी सुरू होण्याअगोदर सरपंचाचे तहसीलदारांना पत्र रेतीची वाहतूक गावातून करू नका ; रेती डेपो ठिकाणी लावलेल्या वृक्ष झाडाची ठेकेदार कडून कत्तल

 

बुलढाणा | सुरेश हुसे

सिंदखेडराजा तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या रेती घाट घेण्यासाठी ठेकेदारांची चढाओढ असलेल्या निमगांव वायाळ येथील रेती घाटाचा लिलाव झाला असून सदर रेती घाटातून ग्रामपंचायत ला 10 टक्के निधी हा प्राप्त होत असतो पण अद्याप प्रयत्न 2022 2023चा निधी ग्रामपंचायत ला प्राप्त झाला नसुन, तसेच रेती घाटाची वाहतुक गावातुन न करता बाहेरून करावी, व रेती डेपोसाठी व वजन काट्याच्या जागी रेती ठेकेदारांनी लावलेल्या झाडांची कत्तल केली असून त्याचा पंचनामा करावा असे आशयाचे पत्र तहसीलदार सिंदखेडराजा यांना ग्रामपंचायत सरपंच सौ शीलाताई रामेश्वर चाटे यांनी यांनी दिले असून पत्राची दखल न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पत्रातून दिला आहे

याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे निमगाव वायाळ येथे रस्ता करण्यासाठी मागील सरपंचांना आठ दिवस उपोषणास बसावे लागले त्यावेळेस निमगाव वायाळ येथे रस्ता मंजूर झाला मात्र रेतीच्या वाहतुकीने रस्त्याची मोठे नुकसान होणार असून या रस्त्यावरून शाळेतील लहाण मुले, मुले, ज्येष्ठ वडील नागरिक यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने एखांदा मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते त्यामुळे सदर वाहतूक गावातून न करता बाहेरून करण्यात यावी याचप्रमाणे 2022 23 मधील गौण खनिजाचे दहा टक्के निधी अद्याप पर्यंत ग्रामपंचायत ला मिळाला नसल्याने तो निधी तात्काळ देण्यात यावा त्याच प्रमाणे सदर ठेकेदाराला तहसील कार्यालय मार्फत रेती डेपोसाठी व वजन काट्यासाठी जी जागा दिली आहे तो गट नंबर 203 असून सदर गट हा एफ क्लास असल्याने या जागेवर सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायत मार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली होती सदर वृक्ष लागवड ठिकाणी डेपोसाठी जागा दिल्याने संबंधित ठेकेदाराने संपूर्ण वृक्ष जेसीबीच्या उपटून नुकसान केले असल्याने त्यांचा पंचनामा करण्याची मागणी सरपंच शिला चाटे यांनी केली आहे

त्याचप्रमाणे सदर रेती घाटाच्या ठिकाणी शासनाचे जीआर प्रमाणे सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली असून निमगाव वायाळ येथील कोल्हापूरी बंधाऱ्याजवळ रेती उत्खनन करण्यास मनाई करण्यात आली आहे सदर प्रकरणी तात्काळ कारवाई करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या